Cotton Market :  काय आहे कापसाचे बाजार भाव, तूर,संत्रा,शेवगा, सोयाबिन पहा काय आहे बाजाराची स्थिती ? 2022 - डिजिटल शेतकरी

Cotton Market :  काय आहे कापसाचे बाजार भाव, तूर,संत्रा,शेवगा, सोयाबिन पहा काय आहे बाजाराची स्थिती ? 2022

सोयाबीन दर

  1. Cotton Market देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात १०० ते २०० रुपयांनी चढ-उतार सुरु आहेत तसेच सोयाबीनचे सरासरी दर टिकून आहेत. देशातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ६०० रुपयांवर एवढा आहे. तर कमाल ६ हजार ४०० रुपये दर हा लातूर बाजार समितीत मिळाला आहे. इतर बाजार समित्यांमधील कमाल दर ५ हजार ७०० रुपयांपेक्षा कमी आहे. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीनला ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला जात आहे.Cotton Market

तुरीचे दर तेजीतच

  1. देशात टंचाई असल्याने सध्या तुरीचे दर तेजीत आहेत तसेच चालू हंगामातही तुरीचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज वक्त होत आहे. त्यामुळं दरात वाढ होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदार यांच्याकडील तुरीच्या साठ्याची माहिती मागितली आहे. सरकारला देशात तुरीचा नेमका किती साठा आहे याचा अंदाज घ्यायचा असल्याने माहिती मागवल्याच सांगितलं जातं आहे. सध्या देशात तुरीला ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे आणि हा दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.

संत्र्याचे दर दबावात

  1. राज्यातील संत्री आता बाजारात दाखल होत आहे तसेच सध्या संत्रीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या संत्र्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. चालू हंगामात पिकाला पोषक वातावरण नव्हते, परिणामी संत्र्यामध्ये गोडी उतरली नाही आणि काही ठिकाणी कीड-रोगामुळे गुणवत्ता कमी झाली आहे. याचा फटका आता संत्रा पिकाला बसला आहे. संत्र्याला मागणी वाढल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला जात आहे.

शेवगा खातोय भाव

  1. सध्या बाजारात शेवग्याचा तुटवडा जाणवत आहे आणि सध्या केवळ मुंबई बाजार समितीतच शेवग्याची आवक जास्त दिसत आहे. मात्र इतर बाजारातील आवक ही ५ ते १० क्विंटलच्या दरम्यान आहे आणि त्यामुळं शेवगा सध्या चांगलाच भाव खात आहे. शेवग्याला राज्यातील बाजारात सध्या सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे तसेच बाजारात आवक वाढेपर्यंत शेवग्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.

कापसाचे दर

  1. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापसाच्या Cotton Market  दरात (Cotton Rate) सुधारणा होत गेली आहे. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारातही कापसाचे दर (Cotton Production) वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यातील दबाव नोव्हेंबरमध्ये काहीसा दूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात २६ ऑगस्टला कापसाचे दर ११८ सेंट प्रतिपाऊंडवर होत होते. तेव्हापासून कापसाच्या दरात सतत घट होत गेली आहे. ३१ ऑक्टोबरला कापूस दर जवळपास दोन वर्षातील निचांकी पातळी गाठत ७२ सेंटपर्यंत घसरले होते मात्र त्यानंतर कापसाचे दर वाढत गेले आहे.Cotton Market

कालपर्यंत कापूस दराने ८८.२ सेंटपर्यंत मजल मारली आहे. देशातही कपसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले होते आणि कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली होती. त्यामुळे दरात वाढ होत कापसाने सरासरी ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. तर कमाल दर ९ हजार ६००  रुपयांपर्यंत पोचले. तर दुसरीकडे कापडाला उठाव नसल्याची चर्चा अद्यापही सुरुच आहे आणि त्यामुळे कापसाच्या दरात चढ-उतार होऊ शकतात, असाही अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. पण शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.Cotton Market

हे हि वाचा : शेअर बाजार: महिनाभरात ‘हे’ शेअर देतील नफाच नफा, वाचा आजच्या मार्केटची स्थिती..

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment